प्रतिनिधी शैलेश कावळे
परमात्मा एक सेवक श्री देवचंदभाऊ कावळे यांच्या कडून चर्चा बैठक रजिस्टर भेट
लाखांदूर तालुक्यातील सोनेगांव/पेंढरी येथे दिनांक 15/12/2024 रोजी मानवधर्माचे सेवक संमेलन पार पडले ,या कार्यक्रमाचे उध्दघाटक आध्यात्मिक प्रमुख मानधर्माच्या प्रचारक व प्रसारीका लताताई दिलीपजी बुरडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी चे अध्यक्ष मा.यंशवत ठबाले गुरुजी, उपाध्यक्ष बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी चे नरेश भाऊ सव्वालाखे तर विशेष अतिथी म्हणून मोरेश्वर सार्वे,कांतीराम पडारे, एकनाथ जिभकाटे,नंथू कोहाट,इंद्रपालजी मते व परिसरातील सेवक, सेविका व बालसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.यादोवरावजी बुराडे यांनी केले.
दिनांक 14/12/2024 रोजी महान त्यागी बाबा जुमदेवजी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले तर 15/12/2024 रोजी एका भगवंताचे जनरल हवन कार्य मार्गदर्शक मा.रविद्रजी गोटेफोडे यांच्या निवासस्थानी पार पडले त्यानंतर गावांमध्ये शोभायात्रा काढण्यात आली, शोभायात्रा संपल्यानंतर लगेच मानवधर्माची चर्चा बैठक सुरू झाली.
अंधश्रधा व वेसनमुक्त करून समाजाला, जनतेला सुखमय जिवन कसे जगता येईल म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवधर्माची स्थापना केली.आणि या मानवधर्मात येणाऱ्या सेवकांचे जिवन सुखमय झाले.या विषयावर मार्गदर्शन झाले.यावेळी या कार्यक्रमाच्या सेवटि परमपूज्य परमात्मा एक सेवक मा.देवचंदभाऊ कावळे व मित्र परिवार यांच्या कडुन सेवकांना चर्चा बैठक रजिस्टर भेट देण्यात आले.आणि मानधर्माचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने रात्रोला तिन अंकी नाटक संगीत अश्त कलीयुगाचा या नाटकाचे आयोजन करण्यात आले.व या कार्यक्रमाचे आयोजक सोनेगांव/पेढरी येथील मार्गदर्शक मा.रविद्रजी गोटेफोडे व सेवक, सेविका व बालसेवक यांनी केले.





Social Plugin