Ticker

6/recent/ticker-posts

ईव्हीएम विरोधात मतदाराचे स्वाक्षरी मोहीम



गायकवाड जळगाव प्रतिनिधी/शौकत शेख 

शेवगाव- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील सर्व मतदार संघात ईव्हीएम विरोधात मतदाराचे स्वाक्षरी मोहीम 3डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राबवण्यात येत आहे या अनुषंगाने आज शेवगाव येथे व शहर तालुक्यातील अनेक स्वाभिमानी मतदारांनी ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत उपस्थित दर्शवली शेवगाव शहरातील क्रांती चौक येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांनी प्रथम स्वाक्षरी अभियानास सुरुवात झाली शेवगाव तालुका अध्यक्ष शेख  प्यारेलाल भाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आले आहे.

 याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा किसनराव चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते म्हणाले महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचा महायुतीच्या बाजूने लागलेला निकाल हा आणि अपेक्षित आणि चमत्कार लागलेला असून हा निकाल भाजपाने केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून ईव्हीएम चा या यंत्राच्या माध्यमातून लावून घेतला आहे.

 अशा निकालाने देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात असून तिचा गळा घोटण्याचा प्रकार भाजप सत्तेचा गैरवापर करत असून त्यामुळे ईव्हीएम हटाव और देश बचाव यासाठी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन रस्त्यावरची लढाई लढणार आहे यावेळी वंचित चे. अरुण पाटील झांबरे. लक्ष्मण मोरे. शैक सलीम. गणेश बोरुडे . संभाजी कुसळकर. भीमा गायकवाड. सुरेश खंडागळे. नितीन गुंजाळ. पप्पू गरजे. संजय चव्हाण. ज्ञानेश्वर पिटेकर  पठाण मेहमूद याकूब भाई. दिलीप वाघमारे. पठाण राजू . रवींद्र बोरुडे. माणिक गालफाडे. विलास वाघमारे. दिलीप घोकासे. व इतर सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते