अंबड तालुका प्रतिनिधी मयूर वाव्हळ
घनसांवगी मतदारसंघातील मोहपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आ. हिकमत उढाण यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, ज्या जिल्हा परिषद शाळेतून त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली, त्या शाळेला त्यांनी भेट देत शाळेतील आठवणींना उजाळा दिला. आ. उढाण यांनी यावेळी संवाद साधताना सांगितले, की त्यांची - स्वतःची शिक्षण संस्था नसली तरी जिल्हा परिषद शाळा हीच त्यांची शाळा आहे. देशाचे उज्ज्वल भविष्य घडवणारे
बाल गोपाळांचे शिक्षण हा माझ्या अत्यंत जवळचा विषय आहे, असे ते म्हणाले. यावेळी भाऊसाहेब जाधव, गणेश नागरे, विठ्ठल चाटे, प्रल्हाद चाटे आदी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका एन.एस. धलपे, शिक्षक अर्जुन वायभाये, दत्ता जाधव, श्रीकृष्ण जाधव, गणेश चाटे, उत्तम साळवे, रामदास सानप, अनिल जोशी, भागवत घुगे, रावसाहेब सानप, भगवान घुगे, बाळासाहेब जाधव, मधुकर जाधव, सल्यभान कुत्तरवाडे, सुनिता वाघ, शिवकन्या वाघ, मंदा वाघ, प्रयाग डिधुळे आदींची यावेळी उपस्थिती होती.





Social Plugin