अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव (जि.जालना) येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कुंभार पिंपळगांव येथील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून क्लासेसच्या संचालकाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला असल्याचे उघड झाले आहे. आसाराम राऊत असे संशयित खाजगी क्लासेस चालकाचे नाव आहे.
या संदर्भात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी बुधवार दि.२५ डिसेंबर रोजी घनसावंगी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. दरम्यान, संशयित क्लासेस चालक सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. के. ढाकणे अधिक खाजगी क्लासेसच्या संचालकावर गुन्हा तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे. तसेच, महिला पोलिसांनी वेळोवेळी तपासणी करून मुलींशी चर्चा करावी आणि जर काही चुकीचे आढळले तर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. कोचिंग क्लासेसना शासनाची परवानगी आहे का, याचीही तपासणी करण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे. न्यायालयीन कोठडीत आहे.
.jpeg)




Social Plugin