तालुका प्रतिनिधी: शंकर निंबारे
देवडोंगरी| त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत देवडोंगरी आणि बोरमाळ येथे पेसा दिन साजरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायती संबंधी उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम १९९६, या कायद्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील पंचायतींना स्वशासनाचा दर्जा प्राप्त झाला. या कायद्याला दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी २८वर्षे पुर्ण होत असल्याने शासनाच्या निर्देशानुसार पेसा दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनु पागी यांची ग्रामस्थांनी प्रथम निवड केली. नंतर अध्यक्षांच्या परवानगीने पेसा दिनाची प्रतिज्ञा घेतली. नंतर प्रास्ताविका सादर करताना ग्रामसेवक सतिश बच्छाव यांनी पेसा दिन साजरा करण्याचे महत्त्व पटवून देत पेसा कायद्याची जनजागृती केली. त्यानंतर इकोनेट संस्थेचे कार्यकर्ते शंकर निंबारे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पेसा ग्रामसभा, महिलासभा तसेच बालसभा या सभांचे महत्त्व आणि अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना देवडोंगरी ग्रामपंचायती अंतर्गत देवडोंगरी, गौळपाडा, सादडपाडा, बोरमाळ/रानपाडा अशा चार पेसा ग्रामसभा आहेत.
यापैकी पेसा ग्रामसभा बोरमाळ/ रानपाडा यागावची अंदाजे तीनशे ते चारशे लोकसंख्या असुन बोरमाळ रानपाडा हे दोन्ही पाड्यावर शंभर टक्के आदिवासी समुदायांची वस्ती असुन मागील सन २०२० सालापासून ग्रामस्थ नियमित दरमहा पेसा ग्रामसभा घेतात. या ग्रामसभेत पाच वर्षांत आमंत्रणे देवून ही एकदाही शासकीय अधिकारी व कर्मचारी आजपर्यंत बोरमाळ ग्रामसभेत उपस्थित राहुन सभेला मार्गदर्शन केले नाही. तसेच तालुका पेसा समन्वयक व जिल्हा पेसा समन्वयक यांनी सुद्धा एकही भेट दिली नसल्याने पेसा दिन साजरा कार्यक्रमात बोलताना सामूहिक वनहक्क व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश वळवी यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इकोनेटचे कार्यकर्ते शंकर निंबारे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन ग्रामसेवक सतिश बच्छाव यांनी केले यावेळी ग्रामसेवक सतिश बच्छाव, ग्रा.पं.शिपाई महेश शेवरे, पेसा मोबीलायझर पवार, पाणी पुरवठा कर्मचारी तुकाराम पाणी, ग्रा.पं.कॅ.ऑपरेटर घुटे, आशा वर्कर आहिल्या वळवी, इकोनेट स्वयंसेवक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.





Social Plugin