Ticker

6/recent/ticker-posts

डोंबिवलीत शेजार धर्माच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ,



मितेश जैन - कल्याण प्रतिनिधी 

डोंबिवली - डोंबिवली पश्चिम कोपरगाव येथे राहणाऱ्या चार वर्षीय मुलीशी लैंगिक चाळे केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना शुक्रवारी २० डिसेंबर तारखेच्या सायंकाळच्या सुमारास घडली आहे.चंद्रकांत हिवाळे (45) याने अंगणात खेळणाऱ्या चार वर्षीय मुलीसोबत अश्लील वर्तन केले. हा प्रकार कळताच कोपरगावचे उबाठाचे शाखाप्रमुख आकाश पाटील यांनी पिडीत मुलीला संरक्षण देण्यासह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यापर्यंत तिच्या कुटुंबीयांना मदत केली.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी चंद्रकांत हिवाळे याला अटक केली आहे. मात्र यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी पीडित मुलीच्या पालकांना धमकावत तक्रार मागे घेण्याचा दबाव आणला.. उबाठाचे शाखा प्रमुख आकाश पाटील यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील पवार व डोंबिवली शहर अध्यक्ष प्रवीण विर्कुड यांना फोन करून तात्काळ या बाबत माहिती दिली .बातमी कळताच  मानवाधिकार समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील पवार व डोंबिवली शहर अध्यक्ष प्रवीण विर्कुड यांनी आपली  टीम घेऊन उबाठाचे शहर अधिकारी सुजल म्हात्रे, माझी युवा सेना अधिकारी राहुल चौधरी,शहर संघटीका ज्योती म्हात्रे,शाखा संघाटीका प्रियांका पाटील आणि त्याचे पदाधिकारी तसेच त्यांचे सहकारी यांनी मिळून विष्णूनगर पोलिस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांच्यासमोर घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली.आरोपीच्या पत्नीविरोधातही धमकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.