Ticker

6/recent/ticker-posts

फिरत्या नारळ महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेने वेधले लक्ष.. शिंदखेड्यात श्रीगुरुदेव मोठेबाबांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजन


 शिंदखेडा (प्रतिनिधी,मनोज सूर्यवंशी  )

प .पु श्री गुरुदेव मोठे बाबा ,अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने येथील भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय यांच्या वतीने फिरत्या नारळाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यानिमित्त चार दिवस अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने सोमवार दि १६ रोजी  शिंदखेडा शहरातुन मोठे बाबा पालखीने भव्य  शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभायात्रा हि शहरातील जागृत देवस्थान श्रीराम मारुती मंदिर माळीवाडा येथून सकाळी ११ वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला .सदर शोभायात्रेत  आठ ट्रॅक्टर व बेचाळीस बैलगाड्यांवर विविध महापुरुष आणि संत महापुरुषांचे फोटोंचा समावेश होता.सदर शोभायात्रा ही शहरातील प्रमुख मार्गांवरून नेत कार्यक्रम स्थळी सांगता करण्यात आली सुमारे चार तास शोभायात्रा सुरु होती यावेळी अनेक भक्तांनीव माता बघीनींनी  डीजे च्या तालावर ठेका घेत आनंद घेत नागरिकांचे लक्ष वेधले.

शहरातील कानुबाई माता नगर, (ताड मळा ) येथे हा उत्सव संपन्न होत आहे. गुरुदेव मोठे बाबा महाराज तथा विठ्ठल महाराज चौधरी यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त बारा वर्षानंतर हा कार्यक्रम शिंदखेडा येथे संपन्न होत आहे. यामध्ये सकाळी पाच ते सहा काकड आरती, ९ ते ११ गाथा भजन, संध्याकाली चार ने पाच प्रवचन आणि संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ, रात्री साडेआठ ते साडेदहा कीर्तन अशी कार्यक्रमाची रूपरेषा असणार असून दि १८ बुधवार रोजी कार्यक्रमाची सांगता असून या दिवशी पुरणपोळी च्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात  आले आहे  

या चार दिवशीय कार्यक्रमाची रूपरेषा अशी असून पहिल्या दिवशी आळंदी येथील उल्हास महाराज सूर्यवंशी, दुसऱ्या दिवशी बीड येथील भरत महाराज जोगी, तिसऱ्या दिवशी पंढरपूर येथील नामदेव महाराज लबडे, यांचे कीर्तन होणार आहे. समारोपाचे कीर्तन जळगाव येथील समाधान महाराज भोजेकर यांचे होणार आहे,  परिसरातील नागरिक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीमार्फत करण्यात आले आहे. ह. भ. प. परमेश्वर महाराज सुराय, ह. भ. प. सुदर्शन महाराज गोंदुर, ह. भ. प. भागवताचार्य  प्रकाश महाराज शिंदखेडा, ह. भ. प. मधुकर महाराज वडगावकर यांच्या संकल्पनेतुन साकार होत आहे.