Ticker

6/recent/ticker-posts

परभणी घटनेच्या निषेधार्थ शिरूर कासार येथे रास्ता रोको करण्यात आला



प्रतिनिधी शौकत शेख 

बीड कासार शिरूर येथे परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची अज्ञात माथे फिरूने विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज सुरू होते रस्ता रोको करण्यात आला यावेळी तेथे सर्व जाती धर्मांनी आपली उपस्थिती दर्शवली तसेच तेथे शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आहे महेबुब भाई शेख हे पण उपस्थित होते परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोरील संविधानाच्या प्रतीकृतीची अज्ञात माथे फिरूने विटंबना केल्याच्या घटनेचे पडसाद परभणी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उमटत असून समस्त आंबेडकरी जनता संतप्त झाली.

 या घटनेचा निषेध करणाऱ्या आंबेडकर तरुणाचा पोलीस कोठडीत डांबून गुन्हे दाखल केले जात आहेत तसेच पोलिसाच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला या घटनेचा निषेध म्हणून शिरूर कासार येथे रस्ता रोको करण्यात आला तसेच कासार शिरूर मधील आंबेडकरी अनुयायी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते