बुध दि .[प्रकाश राजेघाटगे]
संत निरंकारी मिशनचे सातारा झोनचे ब्रह्मज्ञान प्रचारक प. पू. नवनाथ शेलार महाराज यांनी संत निरंकारी मिशनचा प्रचार व आध्यात्मिक विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी केलेले कार्य याबद्दल त्यांना नुकताच "अध्यात्मिक सेवा पुरस्कार" जाहीर झाला आहे.
'आई महालक्ष्मी संमेलन, कोल्हापूर' यांच्या वतीने 29 डिसेंबर 2024 रोजी छत्रपती शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते संजय खापरे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार दिला जाणार असून यावेळी कला, साहित्य, शिक्षण, अध्यात्म, उद्योग, पर्यावरण आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प. पू. नवनाथ शेलार हे फलटण तालुक्यातील शेरीचीवाडी (ढवळ) या गावचे रहिवासी असून गेली 40 वर्ष ते संत निरंकारी मंडळाचा विचार समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अलीकडच्या १५ वर्षापासून श्री. शेलार हे सातारा झोनचे ब्रह्मज्ञान प्रचारक म्हणून काम पाहत आहेत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून, ग्रामीण व शहरी भागामधून प्रवचनांच्या माध्यमातून ते ज्ञानप्रचाराचे महान कार्य करीत आहेत. आपल्या वैयक्तिक तसेच कौटुंबिक सुखात न रमता अध्यात्मिक विचार व सद्गुरूंची शिकवण जनमाणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. याच त्यांच्या उदात्त कार्याची दखल घेत 'आई महालक्ष्मी संमेलन कोल्हापूर' यांनी श्री. शेलार यांचा सन्मान करण्याचे योजले आहे.
त्यांना जाहीर झालेल्या या महनीय पुरस्काराबद्दल सातारा जिल्हा तसेच महाराष्ट्रभरातून संत निरंकारी मिशनच्या अनुयायांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
समाजात कितीही व्यभिचार वाढला तरी संत - महंतांचा व सद्गुरूंचा विचार हा समाजाला सदैव तारणहार ठरत असतो. एकतेचा हाच विचार परमपूज्य नवनाथ शेलार महाराज यांचेकडून भविष्यातही रुजविला जाईल आणि यासाठी हा पुरस्कार त्यांना बळकटी देईल असे मत सत्संग प्रेमींनी व्यक्त केले आहे.





Social Plugin