कृष्णा पवार@ग्रामीण प्रतिनिधी नाशिक
दिंडोरी - परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, चाईल्ड सव्हाईवल इंडिया दिंडोरी, तुलसी आय हॉस्पिटल नाशिक,आणि ग्रामपंचायत वणी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर वार गुरुवार दिनांक 19/12/2024 या दिवशी वेळ सकाळी 9.30 ते 2.00 वाजेपर्यंत घेण्यात आले .
या शिबिरामध्ये 94 नागरिकांनी तपासणी करून घेतली या प्रसंगी त्यामध्ये ग्रामपंचायत मधील लिपिक अमोल जाधव, सदस्य,आशा सेविका निलमताई जाधव वणी खुर्द उपकेंद्राचे आरोग्य सेवक गजानन आडे तसेच चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया दिंडोरी चे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र अहिरे, मेडिकल ऑफिसर डॉ.अनुजा जाधव,फार्मासिस्ट राकेश ढाकणे,आरोग्य शिक्षक कृष्णा पवार व नंदिनी चौधरी,डाटा ऑपरेटर निशा पवार आणि अजय तासकर तसेच तुलसी आय हॉस्पिटल नाशिकचे(ऑप्टोमेट्रिस्ट)गोविंद माने, व आदी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.





Social Plugin