मालेगाव
मालेगाव : तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावात डायरिया व निमोनिया या विषयावर स्वच्छते विषयक जनजागृती करण्यात आली. सेल्फ केअर फॉर न्यू मॉम अँड किड्स अंडर-5 प्रोजेक्ट अंतर्गत, प्लान इंडिया, रेकिट डेटॉल स्वास्थ्य बनेगा इंडिया, आणि स्वास्थ विभाग वाशिम यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत, ग्रामपंचायत मेडशी, एकांबा,दिवठाणा, मरसुळ ,ब्राम्हण वाडा , राजुरा,नागरदास या गावात डायरिया आणि न्यूमोनिया, सांस मोहीम या विषयावर विशेष पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मनोरंजनाच्या माध्यमातून करण्यात आली, ज्याने गावकऱ्यांचा मनोरंजक पद्धतीने उत्साह वाढेल आणि विषयातील त्यांची आवड निर्माण होईल. यानंतर नुक्कड नाटक टीमने डायरिया आणि न्यूमोनियाच्या उपचारासाठी ओआरएस आणि झिंक गोळ्यांचे महत्त्व पटवून दिले. डब्ल्यू एच ओ च्या स्वच्छतेसंदर्भातील सात सुत्री कार्यक्रमाची सविस्तर माहिती या नाटकाच्या माध्यमातून ग्रामस्थांना देण्यात आली. CHW - यांनी निर्जलीकरण आणि ORS चा योग्य वापर करण्याचे प्रत्यक्षित करून गावकऱ्यांना हे समजण्यास मदत झाली. त्यांच्या थेट प्रात्यक्षिकातून प्रेक्षकांना सोप्या आणि प्रभावी उपायांची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान स्थानिक सरपंच, उपसरपंच, शाळेतिल शिक्षक वर्ग, तसेच cho,आशा बोकटे ग्रामस्थ महिला पुरुष, व शाळेतील चिमुकले उपस्थित होते, कार्यक्रम दरम्यान प्लॅन इंडियाचे स्टेट मॅनेजर दिनेश प्रजापती, ब्लॉक ऑफीसर भूषण कोल्हे ,ब्लॉक ऑफिसर विनोद उन्हाळे, chw ,मोहिनी उईके,शीतल जाधव, नागडे,वैशाली ,शुभा इंगळे गुलाबी दीदी,आशा कार्यकर्ता,अंगणवाडी सेविका,ग्रामस्थ आणि संपूर्ण पथनाट्य संघाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.





Social Plugin