अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ
सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी हायस्कूल शाळेच्या प्रांगणात २००४ च्या बॅचचे विद्यार्थी तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आले. रविवार दुपारी १२:०० वाजता स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या इतिहासात प्रथमच हा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा घेण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे विद्यार्थी स्नेह संमेलन मेळावा २० वर्षांनंतर पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुखदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. निसार देशमुख, तर संस्थेचे सचिव रंगनाथ लंगोटे होते. प्रथम महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नरेंद्र वाघमारे, मधुकर देशमुख, शिक्षक बाबासाहेब राखुंडे, राजेश पारडकर, साहेबराव चौधरी, सुरेश मिसाळ, दयाराम अवचार, अनिस शेख, गणेश लंगोटे, पांडुरंग राऊत, जगन लंगोटे, महेमूद बागवान, मुक्ताराम भापकर, कुक्कडगाव सरपंच उद्धव गायकवाड आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ. रामेश्वर पाटील यांनी, तर आभार अनिरुद्ध राखुंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणपत गवारे, ज्ञानेश्वर गुंडे, जिजाबाई गुंडे, विनायक गायकवाड, सुवर्ण अवचार, कृष्णा गाढे, चक्रधर जाधव, विठ्ठल लंगोटे, गणेश नरवडे, मंजू खर्चे, रुक्मिणी शिंदे, अंजना राखुंडे, मीरा शिंदे, वंदना खरात, शितल खरात आदींनी परिश्रम घेतले.





Social Plugin