Ticker

6/recent/ticker-posts

वडीगोद्री-जालना मार्गावर ऊसाचा ट्रॅक्टर उलटला



अंबड तालुका प्रतिनिधी 

वडिगोद्री: अंबड तालुक्यातील वडीगोद्री ते जालना मार्गावरील अरुंद रस्ते व कठडे पुलामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या महामार्गावर असुविधा असल्याने हा महामार्ग वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. वडीगोद्रीजवळ ऊस वाहतूक करणारा डबल ट्रेलर ट्रॅक्टर उलटल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

वडीगोद्री-जालना मार्गावरील वडीगोद्रीजवळ ऊस वाहतूक करणारे डबल ट्रेलर ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून, ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर निखळून पडले होते. ट्रॅक्टर ट्रॉलीचे नुकसान झाले आहे.वडीगोद्री-जालना मार्गाची देखभाल दुरुस्ती न केल्याने मार्गावर अनेक ठिकाणी काटेरी झुडपे वाढल

दिशादर्शक फलकही गायब

• वडीगोद्री-जालना मार्गावर डाव्या कालव्यावरील पुलाजवळ अरुंद रस्ता असल्याने त्या ठिकाणी असलेले दिशादर्शक फलक वाहनांच्या धडकेत वाकले आहेत.

• त्यानंतर दोन दिवसांनी त्या ठिकाणचे वाकलेले दिशादर्शक फलकही गायब झाल्याचे समोर आले आहे. या मार्गावरील धाकलगाव, शहापूर व मठतांडा या ठिकाणचे स्ट्रीट लाईटही गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत.

आहेत. अनेक ठिकाणचे दुभाजक ही तुटलेले आहेत, वडीगोद्री, सुखापुरी फाट्यावरील, बस थांब्याचीही दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डेही पडलेले आहेत. मात्र, या देखभालीकडे संबंधित अभियंत्याचे व कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे.