![]() |
- महिला सह हजारोच्या संख्येने सहभागी -ना अमित शहा व परभणी घटनेच्या निषेधार्थ |
शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
सध्या देशासह राज्यात दोनच घटनावर न्याय पिडीत व सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करत निषेध करित आहेत त्यातील पहिली घटना परभणी येथील सोमनाथ सुर्यवशी ची हत्या करणारे दोषीवर कारवाई करून कडक शिक्षा व्हावी कुटुंबाला पाच कोटींची आर्थिक मदत व सदस्यांना नोकरी दयावी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरचे अनुयायी तर दुसरीकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा त्वरित राजीनामा घेऊन जाहीर माफी मागावी यासह आजही दलित आदिवासी मुस्लिम व इतर सर्व सामान्य जनतेवर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत
त्यांना नेहमीच दाबून मारण्याचा व हुकूमशाही पद्धतीने राजकारण होताना दिसत असल्यामुळे शिंदखेडा तहसील कार्यालयावर सकाळी अकरा वाजता भव्य धडक मोर्चास सुरवात झाली तत्पूर्वी देशाचे माजी पंतप्रधान तथा अर्थमंत्री मनमोहन सिंह यांना सामुदायिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर पासून काढण्यात आला शिवाजी चौफुली, स्टेशन रोड, भगवा चौक, मुख्य रस्ता तर डॉ बाबासाहेब आंबेडकर येथे मोर्चाचा समारोप सभा घेऊन अनेकांनी संबोधित केले त्यानंतर तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडी, भिल समाज विकास मंच, मुस्लिम समाज शिंदखेडा यांनी सयुक्तीक रित्या केले होते शिंदखेडा शहरासह तालुक्यातील समस्त डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज व सर्व पक्षीय संविधान प्रेमीनी सहभागी झाले होते त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे व भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपकदादा अहिरे,जिल्हा सचिव अशोक सोनवणे सुनिल सोनवणे,मुस्लिम समाजाचे विक्की खाटीक, इकबाल तेली,भटक्या विमुक्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवशी तालुकाध्यक्ष सतिष सूर्यवंशी,विजय मोरे, दिनेश मोरे, ॲड अरविंदकुमार मंगासे, रामभाऊ माणिक, सह पदाधिकारी व कार्यकर्ते महिला हजारोच्या संख्येने सहभागी होवुन मोर्चा यशस्वी केला
मोर्चाच्या वेळी शिंदखेडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड, गोपणीय अनंत पवार सह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता





Social Plugin