Ticker

6/recent/ticker-posts

मालेगावचा व्हॉलीबॉल संघ ठरला श्री सेवागिरी करंडकाचा मानकरी



बुध दि. २७ (प्रकाश राजेघाटगे) 

श्री सेवागिरी महाराजांच्या ७७ व्या पुष्यस्मरणानिमित्त आयोजित अखिल भारतीय दिवसरात्र शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धेत वकार यांच्या नेतृत्वाखालील आय  एस सी मालेगाव व्हॉलीबॉल संघाने कुंडलच्या क्रांती सहकारी साखर कारखाना व्हॉलीबॉल संघावर दणदणीत विजय मिळवत प्रथम क्रमांकासह श्री सेवागिरी चषक पटकावले.पुसेगाव (ता. खटाव) येथील श्री हनुमानगिरी हायस्कूल अॅन्ड ज्यूनिअर कॉलेजच्या मैदानावर या स्पर्धेसाठी स्वतंत्र दोन मैदाने तयार करण्यात आली होती.

या स्पर्धेचा शुभारंभ  श्री सेवागिरी देवस्थान मठाधिपती सुंदगिरी महाराज, चेअरमन डॉ . सुरेश  जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख गौरव जाधव, भरतशेठजाधव, अशोक जाधव, जे. टी. जाधव, व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. साखळी पद्धतीने चाललेल्या यादिवस रात्र शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धतील विजेते संघ अनुक्रमे पुढील प्रमाणे आरमान सिद्ध पंजाब  व्हॉलीबॉल संघ (तृतीय), उत्तरप्रदेश व्हॉलीबॉल संघ (चतुर्थ), उत्तराखंड व्हॉलीबॉल संघ (पाचवा), मध्यप्रदेश व्हॉलीबॉल संघ (सहावा), युथ फौडेशन मणेराजुरी  व्हॉलीबॉल संघ तर जहेद स्पो . क्लब मालेगाव व्हॉलीबॉल संघाने आठवा क्रमांक मिळवला.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या आय एस सी मालेगाव  व्हॉलीबॉल संघाला श्री सेवागिरी स्मृती चिन्ह व ५१ हजार रुपये तर इतर विजेत्या संघाना अनुक्रमे ३१ हजार, २१ हजार, ११ हजार तर पाचवा क्रमांक ते आठव्या क्रमांकांच्या संघांना प्रत्येकी ५ हजार रुपये बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत आंतराष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्र शुटींग बॉल संघाचे उपाध्यक्ष व सातारा जिल्हा अध्यक्ष जयवंतराव भोसले , सचिव सुनिल कंटाळे , ऑल इंडिया फेडरेशनचे सदस्य नाना काळे , अध्यक्ष रविंद्र तोमर यांनी भेट दिली .

या खेळाचा प्रेक्षकांना आस्वाद घेता यावा महणून देवस्थान ट्रस्टच्यावतीने गॅलरी उभारण्यात आली होती. या स्पर्धेसाठी उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड , अहिल्यानगर , विदर्भ , पुणे, मालेगाव, सातारा , खडकी , कोल्हापूर, संभाजीनगर, पालघर , बुध सांगली , सोलापूर , फलटण , मळणगाव , धरणगुत्ती   मणेराजूरी, माळशिरस,  येथील नामवंत २९ संघ सहभागी झाले होते.

यावेळी पंच म्हणून  रफिक मोहमद ( राजस्थान ) प्रशांत पवार, राजेश खत्रा, अरविंद पाटील, राजेंद्र तांबे , यांनी काम पाहिले. या स्पधेसाठी दत्तात्रय बांडे सर. , विजय कोकीळ (नियंत्रक), राजेंद्र मोहिते (निरीक्षक), जे.पी. कांदीयान (ऑल इंडिया फेडरेशननिरीक्षक) मूलभूत काम पाहिले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भरतशेठ जाधव, अशोक जाधव, जे. टी. जाधव, मंगेश जाधव, , दीपक जाधव, आर .एन. जाधव सर ,सचिनशेठ जाधव  गौरव शेडगे, निखील जाधव, विजयसिंह जाधव, प्रसाद हिंगमिरे, सचिन चव्हाण , माऊली कुंभार , आदींनी परिश्रम घेतले.