संतोष सूर्यवंशी यांना वाहिली श्रद्धांजली
ग्प्ररामीण तिनिधी मारोती गाडगे/कटचिंचोली
गेवराई (बीड ):- ता १६/१२ गेवराई तालुक्यातील तलवाडा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट )च्या वतीने परभणी जिल्ह्यात संविधान प्रतीची बिटबना जो प्रकार झाला होता त्या निषेधार्थ तलवाडा या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने जुन्या बस स्टॅन्ड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कुर्ती पुतळ्यात घडलेल्या निंदनीय घटनेचा निषेध करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या आठवड्यात परभणी जिल्हा या ठिकाणी एका व्यक्तीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतीच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आलेली होती हे सर्व घटना समाज बांधवांच्या नजर किस आल्यामुळे तात्काळ त्या व्यक्तीला भीमसैनिकांनी चांगला चोप दिला याचे पडसाद राज्यभर उमटत असताना भीमसैनिक संतोष सूर्यवंशी गुन्हा दाखल करत असताना कारागृहातच त्यांचा मृत्यू झाला दिनांक १६/१२/२०२४ सोमवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्यावतीने बंद पुकारण्यात आला यावेळी सर्व समाज बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळ्यापाशी येऊन निषेध नोंदवला यावेळी सरपंच विष्णू हाते, उपसरपंच आज्जु सौदागर, समता परिषदेचे बापू गाडेकर,आर पी आय युवा सर्कल प्रमुख सुमेध करडे, विनोद आठवले, माऊली नाना डोंगरे, रवी मरकड गणेश कचरे महाराज, नजीर कुरैशी, डॉ सुरेश गाधले, आदींनी आपले मनोगत व्यक्त करुन निषेध नोदवला तर कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून मा प. सदस्य बाबासाहेब आठवले, आनंद डोंगरे,ऋषिकेश करडे,जीवन डोंगरे, मोहन डोंगरे, राहुल आठवले, अरुण डोंगरे, महेश मरकड, निखील करडे,अभिजित मरकड, पत्रकार अल्ताफ कुरैशी, आदीजन उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहुजी साळवे क्रांती सेनेचे दादाराव रोकडे यांनी सूत्रसंचालन केले.





Social Plugin