मितेश जैन - कल्याण प्रतिनिधी
बदलापूर - बदलापूर येथील विजय म्हात्रे सर यांच्याबरोबर दुःखद घटना घडली आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. विजय ने ज्या शर्यतीच्या बैलाला माया प्रेम जिव्हाळा दिले त्यानेच शेवटी विजय चा घात केला. १७ डिसेंबर रोजी शर्यतीमध्ये धावणाऱ्या या बैलाला सरावासाठी म्हणून विजयने बाहेर काढले , त्याच्याबरोबर धावत असताना त्याच्या गळ्यात बांधलेली दोरी विजयच्या पायामध्ये अडकली आणि विजय खाली पडला. विजय खाली पडल्यानंतर त्या बैलाने विजयला मारण्यास सुरुवात केली .पहिले पाच मिनिटं काय घडतय काय होतंय हे कळायला मार्ग नव्हता , आजूबाजूचे लोक ही मदतीसाठी धावले परंतु त्या बैलाने एवढे उग्र रूप धारण केले होते की शेवटी यामध्येच विजयचा मृत्यू झाला.हे किती भयानक आहे.
एक युवा आणि तायक्वांदो व स्केटिंग मधले क्रीडा प्रशिक्षक यांचा असा अंत होणे खरंच सर्वांचा मनाला चटका लावणारे आहे. बदलापूर आणि अंबरनाथ मध्ये सर्वांना परिचित आणि तायक्वांदो आणि स्केटिंग खेळातील प्रशिक्षक म्हणून श्री विजय म्हात्रे सर त्यांची ओळख होती. बदलापूर आणि अंबरनाथ मधील अनेक खेळाडूंना त्यांनी राष्ट्रीय आणि राज्य स्पर्धेमध्ये संधी दिली .शेवटी त्यांचा अंत अशा प्रकारे झाल्यामुळे क्रीडा क्षेत्रांमध्ये ही सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





Social Plugin