पुसेगाव दि[प्रतिनिधी ]
कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणात्मक संख्यात्मक वाढीबाबत विचार विनिमय करण्यात आला. याप्रसंगी प्रा .डॉ. एस. आर. क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांची महाविद्यालयात उपस्थिती वाढणे विषयी व विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकासाबरोबर सर्वांगीण विकासावर भर देऊन, कौशल्य विकास अंतर्गत शॉर्टटर्म कोर्स बाबत विचार पालकांच्या पुढे व्यक्त करून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत शॉर्ट टर्म कोर्स महाविद्यालयात घेतले जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असून या कौशल्य विकास कोर्सची माहिती पालकांना दिली आहे. याबाबत सविस्तर चर्चा घडून आली आहे. पालक, विद्यार्थी यांच्या अडचणी, समस्या सूचना जाणून घेऊन त्यावर उपाय व त्या दूर करण्याविषयी चर्चा झाली आहे.
पालक मेळाव्याचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.भोसले आर. पी. यांनी भूषविले असून याप्रसंगी त्यांनी शासनाच्या व विद्यापीठ शिष्यवृत्ती संबंधित पालकांना माहिती देऊन आपल्या पाल्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरला आहे. किंवा नाही याबाबत पालकांनी जागृत असले पाहिजे तसेच महाविद्यालय पुढील वर्षी नॅकमूल्यांकनासाठी सामोरे जात असून त्या दृष्टीने महाविद्यालयांमध्ये भौतिक, शैक्षणिक, सुख सुविधा करण्याची जबाबदारी पंचक्रोशीतील पालकांची सुद्धा आहे असे उद्गार याप्रसंगी व्यक्त केले तसेच आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पालकांनी जागृत असले पाहिजे विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी महाविद्यालयात उपक्रम सुरू असून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र महाविद्यालयात सुरू असले बाबत माहिती दिली आहे त्याचबरोबर महाविद्यालयात पद्धत एमए हिंदी एम कॉम वर्ग सुरू आहे याविषयी माहिती दिली या पालक मेळाव्यामध्ये पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले असून बहुसंख्येने पालक उपस्थित होते तसेच उपस्थित सर्व पालकांना महाविद्यालयाचे माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर अनिल जगताप यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक धोंगडे एस आर यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर एन डी लोखंडे यांनी केले.
.jpg)




Social Plugin