Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय गुणवत्ता परिषदेची गावातील क्षेत्रिय पडताळणी भेट.




प्रतिनिधी - प्रविण फुकट

      दिनांक 19/12/2024 रोजी भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांच्या कडून श्री. राहुल मिश्रा यांनी चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायत कोडंवर्धा या गावांतील अटल भूजल योजना अभिसरण अंतर्गत सादर करण्यात आलेल्या ठिबक सिंचन, तुषार सिंचन , नैसर्गिक आच्छादन, जैविक आच्छादन, शेडनेट, इत्यादी उपाय योजनांना भारतीय गुणवत्ता परिषदे अंतर्गत पाहणी करण्यात आली .

 ग्रामपंचायत मधील सरपंच, पा.पु. स्वच्छता समिती अध्यक्ष, सदस्य, लाभार्थी शेतकरी,ग्रामस्थ व इतर यंत्रणा यांच्याशी योजनेबद्दल प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. तसेच भूजल माहिती केंद्राला सुद्धा भेट देण्यात आली. यावेळी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे जलसंधारण तज्ञ श्री. सचीन चव्हण व कृषी तज्ञ श्री.इंजडकर जिल्हा अंमलबजावणी भागिदार संस्थेचे जिल्हा समन्वयक अधिकारी श्री लोकप्रिय मेश्राम,माहिती शिक्षण आणि संवाद तज्ञ श्री प्रविण फुकट,जलसंधारण तज्ञ श्री क्षितिज पाटील, GEO तज्ञ श्री डहाने,कृषी तज्ञ श्री नारायण फट्टींग,ऋषिकेश तायडे, समुह संघटक श्री रवींद्र भोरगडे ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब, सदस्य लाभार्थी शेतकरी व गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.