Ticker

6/recent/ticker-posts

ई-केवायसीसाठी तिसऱ्यांदा ३१ डिसेंबरपर्यंत मुदत


अंबड.प्रतिनिधी मयूर वाव्हळ 

शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शासनाकडून ई-केवायसीसाठी आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीच्या आत शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार विकास राजपूत यांनी केले आहे.

शिधा शिधापत्रिकेत नाव मिळवण्यासाठी असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शासनाने ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. त्यास अल्प प्रतिसाद मिळत असून, रेशन दुकानदारांकडूनही दुर्लक्ष होत असल्याने शासनाने यापूर्वीही मुदतवाढ दिली होती. तरीदेखील अनेकजण वंचित आहेत. त्यासाठी आतापर्यंत शिधापत्रिकेची ई-केवायसी करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिल्याचे राजपूत यांनी सांगितले.