*घाटबोरी महाराष्ट्र बँकेवर संभाजी ब्रिगेडची पुन्हा धडक*
प्रतिनिधि @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
शेतकर्यांच्या सेव्हींग खात्याला होल्ड लावन्याच्या अनेक तक्रारींवरुन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र घाटबोरी शाखेचे व्यवस्थापक यांना दोन महीन्यांअगोदर दिनांक २० सप्टेंबर रोजी घेराव घालुन परिसरातील हजारो शेतकर्यांच्या तक्रारी मार्गी लावल्या होत्या.त्यामद्ये अनेक शेतकर्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या मार्गी लागल्या होत्या.परंतु त्यानंतरही संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांचेकडे परिसरातील शेतकर्यांच्या पिककर्जाच्या फाईल अनेक महीन्यांपासुन रखडने तसेच खात्यामद्ये स्कॉलरशिप चे जमा झालेले पैसे यांना विड्रॉल साठी अडवनुक अशा तक्रारी मध्यंतरीच्या काळामद्ये येतच होत्या.
परंतु त्यावेळी निवडनुक आचारसंहीता होती.त्यामुळे त्याविषयी काहीही पाउल उचलनं शक्य न झाल्याने आता संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेत्रुत्वात पदाधिकारी पुन्हा बँकेवर धडकले.यावेळी पुन्हा शाखा व्यवस्थापक यांना धारेवर धरले असता त्यांनी अडवलेले पैसे देन्यास होकार दिला.तसेच पिककर्जाच्या चार महीन्यांपासुन रखडलेल्या फाईल यावर एका दिवसात कार्यवाही करन्याचे आश्वासन दिल्यानंतर पदाधिकारी शांत झाले.परंतु यावेळी बोलताना पांडुरंग पाटील म्हणालेत की,जर वारंवार सागुनही शेतकर्यांची पिळवनुक थांबत नसेल अन् तक्रारी येतच असतील तर ह्यापुढे आम्हाला कायदा हातात घेतल्याशिवाय काही पर्याय नाही.अन् शेतकर्यांच्या हक्कासाठी संघर्ष करताना आमच्यावर केसेस लागत असतील त्यालाही आम्ही मागेपुढे बघनार नाही असेही ते म्हणाले.
यावेळी संभाजी ब्रिगेड मेहकर तालुका अध्यक्ष धनंजय बुरकुल, कार्यकारिणी सदस्य गोपाल गवळी, पंजाब पवार, गजानन पवार,लोणी गवळी उपसरपंच राजु लांभाडे, गजानन लोंढे, रामप्रसाद पाचपवार,आकाश अजगर,डॉक्टर अवचार साहेब आदींसह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.





Social Plugin