मालेगाव प्रतिनिधी जावेद भवानीवाले
मालेगाव: दि :14 रोजी तालुक्यातील खडकी येथील जगन्नाथ विठोबा मुठाळ तसेच वारंगी येथील रवी केशरमल शर्मा यांची जिल्हा सत्र न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल पंचक्रोशीतील सर्व विधीतज्ञ समस्त गावकरी तथा तालुक्यातील विविध क्षेत्रातील राजकीय तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते दोन्हीही न्यायाधीशांचा भव्य नागरी सत्कार खडकी येथील गजानन महाराज संस्थान येथे करण्यात आला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करून एका भूमिपुत्राची थेट जिल्हा न्यायाधीश पदी नियुक्ती झाल्याने पंचक्रोशीत आनंद उत्सव निर्माण झाले
खडकी इजारातील अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले नारायण मुठाळ शिक्षक नवनाथ मुठाळ तथा यांचे बंधू जगन्नाथ मुठाळ या तीन भावंडात पूर्वीपासून एकनिष्ठ आणि स्वभाविक ज्याला आपण सामाजिक आणि सर्वांचे चाहते म्हणून असणारे नारायण पाटील खडकी गावात नारायण बोले तशे खडकी चाले पूर्वीपासून एकनिष्ठेने समाजसेवेचा वसा घेणारे तसेच लहानापासून ते थोर व्यक्ती मोठ्यापर्यंत भाऊ दादा अशी उपाधी सदैव वाणीमुख असणारे नारायण पाटील सर्वांचे परिचित आहे आज भावाला जिल्हा न्यायाधीश पदी नेमणूक झाल्याने खडकी गावात आणि गावाच्या मानात बऱ्याच प्रमाणात नवचैतन्य आले मालेगाव तालुक्यातून हाकेच्या अंतरावर असणारे आणि पूर्वीपासून शेतीशी निगडित असणारे खडकी ईजारा आज दोन न्यायाधीशांचे सामूहिक सत्कार समारंभाने पंचक्रोशी भरभरून गेले विविध मान्यवरांच्या उपस्थितांमध्ये
भारतीय जनता पार्टीचे नेते मा.आ.विजयरावजी जाधव, विधानसभेचे आमदार अमित झनक, अतिश देशमुख,सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय शिंदे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गजानन नवघरे, सेवा सोसायटी अध्यक्ष नंदकिशोर नवघरे, दत्तराव पोफळे, दीपक कुटे, विलास मोरे,तथा विविध स्तरावरील विधीतज्ञ सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेतृत्व आदी लोकांच्या उपस्थितीत आज भव्य नागरीसत्कार समारंभ पार पडला





Social Plugin