Ticker

6/recent/ticker-posts

वाघी बु येथे " उत्सव समतेचा " स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेचा कार्यक्रम संपन्न


मालेगाव प्रतिनिधी  जावेद धनु भवानीवाले 

मालेगांव :  मालेगाव तालुक्यातील वाघी बु येथे जि.प.शाळा वाघी या परिसरात उत्सव समतेचा हा कार्यक्रम स्वयम् शिक्षण प्रयोग या संस्थे मार्फत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला  उत्सव समतेचा या कार्यक्रमा निमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. व तसेच महिलां आणि विद्यार्थांच्या विविध प्रकारच्या अनेक स्पर्धाचे आयोजन करण्यातआले त्या मध्ये .निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,खुल जा सिम सिम ,अडथळ्यांची शर्यत साप सीडी , पाहुण्यांशी गप्पा , सेल्फी स्टॅन्ड अशा विविध प्रकारच्या स्पर्धा .तसेच भरोड ,लोकगीते, कलापथक ,च्या माध्यमातून स्वच्छता, अभियान सार्वजनिक वैकतिक स्वच्छता , ई माहिती चा संदेश या कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आला.

स्वयम् शिक्षणं संस्थेच्या वतीने विजय शेगर (तालुका समनव्यक) यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेची माहिती स्थापना संस्थेचे कार्य याची पद्धतशिर माहिती दिली .स्वयंम् शिक्षण प्रयोग ही संस्था ग्रामीण भागात १९९३ पासून कार्यरत आहे.संस्था सात राज्यात महाराष्ट्र,केरळ ,बिहार,ओडिसा, आसाम,कर्नाटक ,गुजरात,३२७४ पेक्षा अधिक गावामध्ये शाश्वत, शेती ,पोषण ,आरोग्य ,पाणी, स्वच्छता , उद्योजकता,विकास या विषायास अनुसरून कार्यरत आहे.मालेगांव तालुक्यातील ५० गावे वाशिम तालुक्यातील ५० गावे असे ऐकून १०० गावामध्ये १० हजार महिला ६००० हजार शाळेतील विद्यार्थी सोबत स्त्री _ पुरुष समानता,पाणी आरोग्य ,पोषण,आणि स्वच्छता ,तसेच सेंद्रिय शेती ,गावं कृतीगट बळकटिकरण ई विषयावर काम करीत आहे.ग्रामपंचायत ला सोबत घेऊन लोक सहभागातून ग्राम आराखडा तयार करणे. इत्यादी प्रकारची कामे संस्थेच्या वतीने करण्यात येते असे वर्षा घुगे यांनी उपस्थित महिला गावकरी मंडळी यांना सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघी ग्रामपंचायत चे सरपंच तेजराव वाघ ,त्याच प्रमाणे उपसरपंच जगन्नाथ बरे ,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई खिलारे , सुनीता वाघ,गजानन खिल्लारे ,आशा वर्कर रंजना वाघ ,अंगणवाडी सेविका सीमा वाघ व मदतनीस छबूताई खिल्लारे , आरोग्य सखी माधुरी खिल्लारे ,आकाश खिल्लारे ,त्याच प्रमाणे स्वयम् शिक्षणं प्रयोग संस्थेचे जिल्हा समनव्यक काकासाहेब आडसुळे ,तालुका समनव्यक आकाश पट्टेबहादूर शिक्षण समितिचे अध्यक्ष पुरुषोत्तम वाद्य या मान्यवरांची उपस्थित लाभली.

 तसेच स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमला पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी वर्षा घुगे (मास्टर ट्रेनर) ,शायका परवीन (मास्टर ट्रेनर) , मंदाकिनी (मास्टर ट्रेनर), माधुरी खिल्लारे (आरोग्य सखी ) यांनी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन व परिश्रम घेतले.व तसेच वर्षा घुगे यांनी कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व उपस्थित मान्यवर,महिला विद्यार्थी व गावकरी मंडळी चे आभार मानले