Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा फुले युवा प्रतिष्ठानची स्थापना



राजकुमार चिंचोळकर बाळापूर 

सामाजिक दायित्व स्विकारुन सामाजिक हित जोपासत बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे महात्मा फुले युवा प्रतिष्ठाणची स्थापन करण्यात आली आहे तर थोर समाजसुधारक क्रांती सुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवीन विठ्ठल मंदिरात आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले युवा प्रतिष्ठानचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आहे तर महात्मा फुले युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुश्रुत भुस्कुटे उपाध्यक्षपदी अनिरुद्ध घाटोळ अभिजित घाटोळ मंगेश सोनटक्के यांची तसेच हर्षल जढाळ सचिव राहुल सांगोकार सहसचिव शैलेश मसने कोषाध्यक्ष अजय लोखंडे  सह कोषाध्यक्ष श्रिकांत मसने कार्याध्यक्ष मंगेश मसने संघटक गणेश लोखंडे सह संघटक राहुल हांडे सदस्यपदी प्रविण मसने अनिल सोनटक्के यांची सर्वानुमते नियुक्त करण्यात आली त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ हिंमतराव घाटोळ अरुण हुसे डॉ सुभाष भुस्कुटे डॉ विवेक चिंचोळकर सुरेंद्र पल्हाडे मुरलीधर धनोकार दिपक मसने महादेव लोखंडे राजकुमार चिंचोळकर राजेंद्र पल्हाडे जयेंद्र कातखेडे अशोक घाटोळ अमोल पोटदुखे सह आदी समाज बांधव उपस्थित होते तर प्रारंभी क्रांती सुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले आहे कार्यक्रमाचे संचालन सुश्रुत भुस्कुटे यांनी तर अनिरुद्ध घाटोळ यांनी आभारप्रदर्शन केले