Ticker

6/recent/ticker-posts

विना परवाना सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई व्हावी: श्री सेवागिरी रयत संघटनेची मागणी

छायाचित्र - वडूज - उपसभापती विजय शिंदे यांना निवेदन देताना  संदीप जाधव, गणेश जाधव, सचिन देशमुख, प्रतिक जाधव विजय मसणे


बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

खटाव तालुक्यातील विविध बाजारात तसेच इतर ठिकाणी विनापरवाना सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पुसेगाव ता खटाव येथील रयत संघटनेच्या वतीने कऱण्यात आली आहे.

याबाबत वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती विजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप जाधव,ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त सचिन देशमुख, माजी सरपंच विजय मसणे, व्यापारी असोसएशनचे प्रतिक जाधव आदी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनानुसार खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेल्या सोयाबीन मालाची खरेदी बरेच व्यापारी आठवडे बाजारात, तसेच किरकोळ स्वरुपात रस्त्यावर करत आहेत. वास्तविक कृषी उत्पन्न बाजार समितीचा कोणताही परवाना नसताना काही व्यापारी शेतकऱ्यांच्या कडून सोयाबीन मालाची खरेदी करत आहेत.वजन काट्यात तसेच अन्य मार्गाने सदर व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत, दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे सदर प्रकारास  पायबंद घालण्यासाठी वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे.