Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांचा प्रशासनाला ईशारा



प्रतिनिधी @ समाधान भुतेकर ईसरूळ 

साहेब पाण्याची वाट पाहतोय पाणी येईल का येईल तर कधी.. भावनिक सात घालत युवासेना उपजिल्हाप्रमुख  संतोष भुतेकर  यांनी भारत बोर्डे व इतर काही शेतकऱ्यांसमवेत  खडकपूर्णा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणाच आणला उघड्यावर बुलढाणा जिल्ह्यातील देउळगाव राजा  तालुक्यात संत चोखासागर जलाशयाचा जन्म झाला तो शेतकऱ्यांना हरित क्रांतीचे स्वप्न दाखवून याच जलाशयाचे काम होत असताना एक ना दोन नव्हे तब्बल आठ गावांची जमीन पाण्याखाली गेली अनेक लोक भूमीहीन झाले आठ गावच्या लोकांचे घरदार पाण्याखाली बुडाली त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा मोबदला जो मिळाला तो खूपच कमी होता तरी पण सुद्धा आपल्या राहिलेल्या जमिनीला चांगले दिवस येतील आपल्याला पाणी मिळेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली खरी परंतु अजूनही हरित क्रांतीचे स्वप्न पाहिजे तसे सत्यात उतरलेले दिसत नाही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाटाचे कामे झाली 2010 ते 12 13 या सालामध्ये पाटाची काम अतिशय जोमाने सुरू झाली पण कोणाची नजर लागली कुणास ठाऊक पाटाचे सर्व ठिकाणचे काम हे अर्धवट झाले बारा वर्ष निघून गेले एक तप पूर्ण झाले अजूनही कुठल्याच मायनर  किंवा कुठल्याच कालव्याला पूर्ण टोकापर्यंत पाणी पोहोचलेले नाही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजून चाऱ्या पूर्ण नाही पाटा चे काम सुद्धा बऱ्याच ठिकाणी अर्धवट पडलेले आहे शेतकऱ्यांचा मोबदला रखडलेला आहे परंतु ज्या ठिकाणी पाट पूर्ण झाले त्या ठिकाणी तरी शेतकऱ्यांना पाणी पोहोचायला पाहिजे होते पण नाही वेळेवर तेही पाणी पोहोचवण्यामध्ये खडकपूर्णा प्रशासन अपयशी ठरत आहे वर्षातून तीन वेळेस पाणी सोडण्याचे नियोजन असताना आता दुसऱ्यांदा पाणी सोडायची वेळ झाली असली तरी अजून पहिलेच पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले नाही तुरीला पाणी बसेल या आशेने शेतकरी पाण्याची वाट पाहत होता तूर गेली हरभरा गेला ज्वारीचे पीक उभ्या उभ्या वाळून गेले पाण्याची वाट पाहत पाहत अजून पर्यंत पाणी नाही मिसळवाडी शेळगाव आटोळ डोढरा  शिवारामध्ये पंधरा दिवस झाले 

पाणी सुटून अजून पाणी पोहोचले नाही पाटामध्ये प्रचंड झाड झुडपं दगड अनेक ठिकाणी पाठांची गळती या सर्व गोष्टी उघडपणे पडून आहेत जर संत चोखा सागर जलाशयातून शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तीन विभाग शासनाने नेमून दिले आहेत एक धरणाची निगा राखून शेतकऱ्यांना पाणी देण्याचे नियोजन करणारा विभाग दुसरा मोटर पंप पाठाची दुरुस्ती अजून या सगळ्यांचा समन्वय ठेवणार तिसर डिपार्टमेंट असे सर्व असताना शेतकऱ्यांना वेळेवर पाणी पोहोचत नाही वेळेवर यांची पंप जळतात कशी छोट्या-मोठ्या तांत्रिक अडचणी यांना अगोदर का दुरुस्त करता येत नाही  शासनाच्या गाड्या बंगले ऑफिस बलाढ्य पगार इतका सगळा लाभ घेणारे हे अधिकारी नेमकं करतात काय खरंच पाट पूर्ण होतील का चाऱ्या पूर्ण होतील का पश्चिम महाराष्ट्रात जसं पाटाचं झुळझुळ वाणी पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाहत जाऊन शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनवलं तसं आमचं होईल का होईल तर कधी अशी भावनिक साद संतोष भुतेकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडे घातली असून यावरच न थांबता सर्व कामे नीट व्यवस्थित जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमचा पिक्चर सोडण्याचा इशाराही व्हिडिओच्या माध्यमातून युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी व शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे