Ticker

6/recent/ticker-posts

मेडशी येथील युवकाची केंद्रीय सुरक्षा बल मध्ये निवड*



                                                *गावकऱ्यांच्या वतीने जंगी सत्कार*

मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

मेडशी :15 मेडशी येथील आदिवासी समाजातील अत्यंत गरीब परिस्थितीत व शेतकरी कुटुंबात 7 नोव्हेंबर 2001 रोजी गणेश रमेश करवते या युवकाचा जन्म झाला. भारत सरकारच्या कर्मचारी चयन आयोगाच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये निवड झाल्यामुळे त्याचं गावातील नागरिकांनी अभिनंदन करत सत्कार केला.कारणही तसेच आहे लहानपणापासून शिक्षणासोबत शेतीचे काम करणे मजुरी करणे मेहनत करणे व दोन पैशाचा आधार घरच्यांना देऊन स्वतःचे शिक्षण तसेच परीक्षा देत भरतीची तयार करत होता.

मात्र त्याला जसं पाहिजे यश येत नव्हत. एक वेळ तर अशी आली होती की तो लागेल की नाही आणि त्याने आता प्रयत्न न करता वडिलांचा शेतीमध्ये,मजुरीमध्ये हातभार लावून घर चालवावे. मात्र गणेशला माहीत होतं की काही जरी झालं तरी भारतीय सैन्य दलात कोणत्या ना कोणत्या पदावर काम करायचं आणि हीच त्याची जिद्द,चिकाटी,मेहनत च्या पुढे नशिबाला सुद्धा झुकावे लागले. वारंवार येणाऱ्या अपयशाला पायाखाली तुडवून अखेर गणेश करवते याने यशाचे शिखर गाठलं. आणि त्याच्या या खडतर प्रवासामध्ये त्याला त्याचे वडील रमेश काशिराम करवते व आई सौ शोभा रमेश करवते यांनी खूप मदत केली.त्यामुळेच आपण आज या ठिकाणी पोहोचू शकलो असे गणेशचे म्हणणे आहे.