Ticker

6/recent/ticker-posts

15 डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रभरात "ॲग्रीस्टक " गाव नोंदणी अभियानाला सुरवात


 मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

 महाराष्ट्र शासन जमाबंदी आयुक्तालय आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्तपणे 15 डिसेंबर 2024 पासून संपूर्ण राज्यभरात " ॲग्रीस्टक " गाव नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.ॲग्रीस्टक गाव नोंदणी अभियानाचा फायदा हा महाराष्ट्रातील बळीराजा म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे  या अभियानाद्वारे बळीराजाची समग्र ओळख म्हणजेच फार्मर रजिस्ट्री तयार करून प्रत्येक शेतकऱ्याला एक फार्मर आयडी दिली जाणार आहे त्याद्वारे शेतकरी हा अनेक सरकारी योजना व शेतीशी निगडित असलेल्या इतर सेवांचा सहज लाभ घेऊ शकतो 

 त्यामध्ये कृषी हवामान सल्ला, हवामानाची आकडेवारी, मृदा आरोग्याची माहिती, कीड व रोग प्रादुर्भाव चे अंदाज, पिकनुसार विहित किसान क्रेडिट कर्ज, हंगामी पिकांचा माहिती संच, भूसंदर्भीकृत भूभाग असणारे गाव.नकाशे याची माहिती संच, शेतकऱ्याचा व त्याच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच, व इतर कृषी विभागाची सलग्न असलेल्या अनेक शासकीय योजनेचा लाभ शेतकरी बांधवांना मिळण्यास मदत होईल.

 तसेच शेतकरी माहिती संचामुळे   एक वेळ नोंदणी केल्यावर विविध कल्याणकारी योजनेचा लाभ आणि अनुदान वितरणात सुलभता व शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले, विविध संस्थेकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नवीन्यपूर्ण कार्यक्रमाचा विस्तार व प्रचारात सफलता प्राप्त होईल.पिकासाठी कर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फो स्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करून दिले जातील. कृषी क्षेत्रात ॲग्रीस्टकच्या वापराने शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या विविध योजनेचा जलद व परिणामकारक रीत्या लाभ घेण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत मिळेल.

 ॲग्रीस्टक गाव नोंदणी अभियानात शेतकऱ्याला आपल्या नावाची नोंद करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे खालील प्रमाणे ठरवून देण्यात आलेली आहेशेतजमीन सर्वे नंबर, खाते पुस्तिका, सातबारा, आठ अआधार नोंदणीकृत फोन नंबर, व आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी गावाचे तलाठी, अथवा कृषी सहाय्यकाशी संपर्क साधण्याचे आवाहन. कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून समाज माध्यमाद्वारे होत आहे