Ticker

6/recent/ticker-posts

रामेश्वर तोंडे यांना राष्ट्रीय स्तरावरील महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर



प्रतिनिधि @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी 

मेहकर येथील संताजी कॉन्व्हेंट ,मेहकर  येथील (कला शिक्षक) व नुकतीच जि.प.हायस्कूल मंगरुळ नवघरे नियुक्ती झाली आहे.  यांना नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील महात्मा ज्योतिबा फुले आदर्श चित्रकला शिक्षक पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण भारती रेसिडेन्सी, नंदुरबार येथे रविवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष तथा महासंचालक गोरख देवरे, इंटरनॅशनल प्लॅनेट ब्यूटी क्वीन डॉक्टर नूतन मिस्त्री, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सदस्य डॉ. एम जे रघुवंशी, सचिव डॉ. जय बी बागुल, गटशिक्षणाधिकारी प्रशांत नरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार, नॅशनल डायरेक्टर प्रदीपकुमार अहिरे, तथा नैसर्गिक मानवाधिकार फोरमचे प्रा. मंदाकिनी भाकरे, प्रफुल्ल पाटील, ईश्वर पाटील, कैलास पाटील, सचिन शुक्ल, डॉ. ज्योती लष्करी यांची उपस्थिती राहणार आहे. रामेश्वर तोंडे  हे एक विद्यार्थी प्रिय शिक्षक असून महाराष्ट्रातील अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.  राज्यस्तरीय  सर्वपल्ली राधाकृष्णन  आदर्श चित्रकला  शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार, उत्कृष्ट चित्रकला,विज्ञान प्रदर्शन तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय  राज्यस्तरीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. उत्कृष्ठ अध्यापन,गाण्यांच्या चाली, अध्यापनासाठी असलेले आवड,  व परिसरात असलेला दांडगा जनसंपर्क यासाठी रामेश्वर तोंडे  ओळखले जातात. नैसर्गिक देशपातळीवरील हा पुरस्कार रामेश्वर तोंडे  यांना जाहीर झाल्याबद्दल परिषदेचे राष्ट्रीय संचालक गोपाल देवरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, संताजी कॉन्व्हेंट मेहकरचे  अध्यक्ष ,डॉ.गंगाधर क्षिरसागर सर,उपाध्यक्ष अॅड संतोष राजबिंडे सर ,सचिव संतोष डोंबळे सर, प्राचार्य मनिषा राजबिंडे  मैडम,उपप्राचार्य विशाल डोंगरे सर,व जि.प.हायस्कूल मंगरूळ नवघरे ता.चिखली येथील प्राचार्य श्री मा.गाडेकर सर,श्री सरोदे सर,इतर

 सर्व शिक्षक , संचालक मंडळ,व्यवस्थापन समिती व विद्यार्थी  बंधू भगिर्नी यांनी अभिनंदन केले आहे.