बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
बुध (ता खटाव) येथील रहिवासी सौ. सुजाता दिलीप जगदाळे यांनी दिल्ली आणि कोलकता येथे नुकत्याच पार पडलेल्या 21 किलोमीटर आंतरराष्ट्रीय टाटा मॅरेथॉन शर्यतींमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. 53 वर्षीय सुजाता जगदाळे यांनी या मॅरेथॉन शर्यती केवळ 2 तास 23 मिनिटाच्या कालावधीमध्ये पूर्ण केल्या आहेत. पुणे येथील जे जे ग्रुप ऑफ रनर्स या मॅरेथॉन धावपटू क्लबच्या त्या सदस्य आहेत. या क्लबच्या केंद्र संचालिका स्वरूपा भडसावळे यांनी त्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
यापूर्वीही त्यांनी पुणे आर्मी मेडिकल कॉलेज स्पोर्ट्स ग्रुप, मुंबई व बेंगलुरु येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन शर्यतीमध्ये यश मिळवले होते.ग्रामीण भागातील मुलींसाठी अशा प्रकारच्या क्रीडा प्रकारांमधून भविष्यात करिअरची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते असे त्यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
त्यांच्या या यशाबद्दल बुधचे माजी सरपंच बाळासाहेब इंगळे, माजी सरपंच अशोक पुरे , सरपंच सौ . सुजाता बोराटे , उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे, विजयसिंह घाटगे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.





Social Plugin