Ticker

6/recent/ticker-posts

फळपीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या : आमदार कुचे



बदनापूर : जिल्ह्यातील वंचित फळपीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करावी, अशी प्रश्न बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना हिवाळी अधिवेशनात मांडला, जालना जिल्ह्यातील फळबागधारक शेतकऱ्यांनी 'एचडीएफसी ऍग्रो' या विमा कंपनीकडे २०२३ - २०२४ मधील आंबिया बहार मोसमातील हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंतर्गत विमा भरला होता. यात मोसंबी, द्राक्ष, डाळिंब आदी फळपिकांचा समावेश आहे. मात्र, ऐन आंबिया बहारच्या मोसमात बेमोसमी पाऊस झाला. 

एकूणच सततचा पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळेत आणि नियमानुसार फळपिकांचा विमा उतरविल्याने साहजिकच सर्व शेतकरी विम्याच्या परतावा मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत. अर्थात विमा कंपनीने काही विमाधारक शेतकऱ्यांना भरपाई दिली. मात्र, अद्याप देखील मोठ्या प्रमाणात विमाधारक फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना फळबाग विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे आपण संबंधित कंपनीला फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देशित करावे, अशी मागणी आमदार नारायण कुचे यांनी विधानभवनाच्या सभागृहात केली.