Ticker

6/recent/ticker-posts

सेवागिरी यात्रेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण



जिल्ह्यातील चारही कॅबिनेट मंत्र्यांची मठाधिपती, विश्वस्तांनी घेतली भेट


बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ] 


महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यासह जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना देण्यात आले आहे. देवस्थानचे मठाधिपती, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्तांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान सर्व मान्यवरांना रथोत्सवाचे निमंत्रण दिले.


श्री सेवागिरी महाराजांच्या ७७ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित यात्रेचा २९ डिसेंबर हा रथोत्सवाचा मुख्य दिवस आहे. दरवर्षी राज्य मंत्रिमंडळातील मान्यवरांच्या हस्ते रथपूजन केले जाते. यंदाच्या रथोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव आणि सहकाऱ्यांनी आमदार महेश शिंदे यांच्यासह नागपूर येथे मंत्रिमंडळातील मान्यवरांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात आले.             छायाचित्र - नागपूर : श्री सेवागिरी रथोत्सवाचे देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देताना सुंदरगिरी महाराज, डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, रणधीर जाधव, संतोष वाघ. त्या वेळी महेश शिंदे आणि मनोज घोरपडे