Ticker

6/recent/ticker-posts

मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी ॲक्शन मोडवर प्रदुषणाला आळा घालण्यासाठी प्लास्टिकवर बंदी



प्रतिनिधी -सुमित खंडारे मेहकर 

एकदा वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी मेहकर नगर परिषदेचे मुख्याधिकारी ॲक्शन मोडवर असून याविषयी गांभीर्य घेत ठोस पावले उचलण्याचे ठरवले आहे. राज्यात प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने ७ जुलै २०२२ च्या बैठकीत महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना २०१८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य सरकारने १५ जुलै २०२२ ला अधिसूचनेद्वारे प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांव

   या सुधारणेनंतर राज्यात प्लास्टिक लेपीत (Coating) तसेच प्लॅस्टिक थर (Laminated) असणाऱ्या पेपर किंवा अल्युमिनियम इत्यादींपासून बनवलेले डीस्पोजेबल डीश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इत्यादी एकल वापरावर, वापर उत्पादनावर आता बंदी असणार आहे. दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचा कचरा कमी करणे हा बंदीमागचा मुख्य उद्देश आहे. ज्यातील शहरे, ग्रामीण भागात दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीय आहे. यातील कचऱ्याचे विघटन व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. हा कचरा जलाशयांमध्ये व कचरा डेपोत फेकला जातो. त्यामुळे एकल प्लास्टिक चा वापर बंद व्हावा व पर्यावरणास धोकादायक ठरणारे प्लास्टिक कायमस्वरूपी बंद व्हावे, याकरिता मेहकर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेत एक कदम स्वच्छता की ओर चे संकल्प चित्र साकारले आहे. येनारे नववर्ष हे निरोगी व आरोग्यदायी जावे, येणाऱ्या वर्षात मेहकर प्लास्टिकमुक्त असणार,  याची शास्वती देत मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी नागरिकांमध्ये नवीन उमेद दिली आहे. मुख्याधिकारी यांनी नवीन पथक तयार केले असून त्या अंतर्गत न. प. मुख्याधिकारी रामराजे कापरे, व उपमुख्याधिकारी खिल्लारे मॅडम, कार्यालयीन अधीक्षक अजय चेताने, करअधिकारी सुधीर सारोळाकर, स्वच्छता निरीक्षक संजय गिरी, नगर अभियंता किशोर ढेपले, नगर रचना अभियंता प्रियांका सुरवसे, प्रगती काळे, लेखाविभाग गणेश डोंगरे यांच्यासह  न.प. कर्मचारी कार्यरत आहेत.

        सदर बंदीचे आवाहन सक्तीचे असून गुन्हा करणाऱ्यास प्रथम गुन्हा ५००० रुपये दंड शुल्क आकरणी करण्यात येईल, म्हणून नागरिकांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन, मार्केट मध्ये किंवा वस्तू खरेदीकरिता कापडी पिशव्या वापराव्यात याचे जाहीर व नम्र आवाहन न. प. मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी केले आहे.