Ticker

6/recent/ticker-posts

यात्रेमधील व्यावसायिकावर झोपेतच काळाने घातला घाला



एक ठार; दोघे जखमी : पुसेगावात टेम्पोला ऊसाच्या ट्रकची धडक


बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे] 

पुसेगाव यात्रेत दिवसभरव्यवसाय करून रात्री टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा करून व्यापारी झोपले होते. त्यांच्या टेम्पोला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. यामध्ये व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमरास झाला. रामबाबू शहा असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.कुंदन रामबाबू शहा याने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.  त्यानुसार रामबाबू देवचंद शहा (वय ४५, रा केडगाव, ता. अहमदनगर) यांचा गादी, उशा, तक्के विक्रीचा फिरता व्यवसाय आहे. पुसेगाव येथे सुरू असलेल्या सेवागिरी यात्रेत रामबाबू शहा हे कुटुंबासह व्यवसायासाठी आले होते. सातारा - पंढरपूर रस्त्यालगत रविवारी दिवसभर व्यवसाय केला. रात्री टेम्पोत पुढच्या सीटवर रामबाबू शहा, तर मागे मुलगा कुंदन आणि भाचा रोहन विनोद शहा झोपले होते. रात्री तीनच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रक (एमएच १२ एचडी ५२९९) यावरील चालक ऋषिकेश शामराव सावंत याचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेला उभ्या असलेला टेम्पो (एमएच १६ सीडी ०८६२) ला जोरात धडक दिली.

या अपघाताची माहिती देवस्थानमध्ये देणगी रक्कम मोजत असलेल्या ट्रस्ट पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मिळताच सर्वांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.टेम्पोमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढले. मात्र, यात रामबाबू शहा यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर इतर दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर पळून गेलेला ट्रकचालक ऋषिकेश शामराव सावंत (रा. सोमेश्वर, ता. बारामती) याच्यावर पुसेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहापक फौजदार डी .बी. बर्गे करित आहे .    छायाचित्र - पुसेगाव येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात झाला. अपघातानंतर घटनास्थळी वाहतूक विस्कळीत झाली होती.