Ticker

6/recent/ticker-posts

संत नरहरी महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा 1 फेब्रुवारीला



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 


   मालेगाव :दि 20जाने2024येथे नव्याने निर्माण केलेल्या भव्य श्री संत नरहरी महाराज सोनार मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान विधिवत कार्यक्रमाने सम्पन्न होत आहे.

       मालेगाव येथे नागरतास रोडवरील एका खासगी शाळेजवळ भव्य दिव्य श्री नरहरी महाराज सोनार मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दि २९रोजी सकाळी गावातून मूर्तीची भव्य शोभा यात्रा काढण्यात येईल, त्यानंतर पूजन, हवन, मूर्ती प्राणप्रतिष्ठा,अभिषेक, कीर्तन आदी कार्यक्रम दि ३०ते १ या काळात होतील,या वेळी दि ३१ जानेवारी रोजी रात्री हभप अशोक महाराज, ईलग महाराज शास्त्री, बीड यांचे कीर्तन होईल दरम्यान मृदूंगाचार्य संदीप महाराज गव्हाणकर, गायनाचार्य नामदेव महाराज नरवाडे नर्सी नामदेव, नारायण महाराज गरड आळंदी, मंगेश महाराज गावंडे यांची साथ लाभणार आहे. १ फेब्रुवारी रोजी सकाळी हभप माधव बाबा इंगोले, आळंदी यांचे काल्याचे कीर्तन होईल,यज्ञ पूजा शशिकांत महाराज देव यांच्या द्वारे होईल, तर कलशारोहन हभप माधव बाबा इंगोले,प पू महेशगिर बाबा, प पू शांतीपूरी महाराज यांचे हस्ते होणार आहे.

 कलशारोहाना नंतर भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. यावेळी सोनार समाजातील मान्यवर , खासदार, आमदार, माजी खासदार, मुख्याधिकारी न पं, तहसीलदार,जि प चे, नगर पंचायत चे आजी माजी पदाधिकारी, ठाणेदार, उद्योगपती तथा इतरही विविध पक्षाचे पदाधिकारी, महाराज मंडळी आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे, तसेच विशेष आमंत्रित मान्यवर मंडळी, श्री विश्वकर्मा संस्थान शिरपूर चे विश्वस्त मंडळी, यांच्या सह प्रमुख अतिथी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत . 

या भव्यदिव्य कलशारोहन व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास समाज बांधवानी उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाचा, दर्शनाचा, महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संत नरहरी सोनार ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष गणेश अर्धापूरकर, उपाध्यक्ष अमोल कल्याणकर, सचिव विनोद बानाइतकर, कोषाध्यक्ष महेश अंजनकर, सदस्य अतुल भांडेकर, जीवन भांडेकर ,संदीप गौरकर, डॉ. श्रीकांत भांडेकर, राहुल भांडेकर ,जितेश पंडितकर , तसेच सराफा असोसिएशन आणि समस्त सोनार समाज बांधवाच्या वतीने करण्यात येत आहे.