मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
वाशिम :दि 23/जाने 2024 राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा मध्ये चालु असलेल्या 100 दिवसीय क्षयरोग मोहीम अंतर्गत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याबाबत जिल्हाभरात जनजागृती केली जात आहे. या करिता खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यक्रमाला डॉक्टर असोशीयेशन मंगरुळपीर यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्री.पांडुरंग ठोंबरे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.श्री.परभनकर, मंगरूळपीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.धनश्री जाधव जिल्हा कार्यक्रम समन्वयक समाधान लूनसूने,जिल्हा पी.पी.एम समन्वयक जयकुमार सोनुने,अशोक भगत,गणेश रगुवंशी,संतोष बल्लाळ,आरोग्य सहाय्यक विनोद श्रीराव,सांख्यिकी सहाय्यक प्रमोद उगले,लेखापाल जितेश वर, पि.पि.एस.एय जिल्हा कोऑर्डिनेटर डिगांबर महाजन, क्षेत्रकार्य अधिकारी प्रदिप पट्टेबहादूर,
यांची उपस्थिती. डॉ.ठोंबरे यांनी टीबी मुक्त भारत अभियान संदर्भात मार्गदर्शन केले असून देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांना आवाहन केले आहे की भारत हा 2025 पर्यंत टीबी मुक्त झाला पाहिजे याकरिता आपण सर्वांनी एक संकल्प केला आहे. या संकल्पना साठी सर्वांचे योगदान हे महत्त्वाचा आहे आपण सर्व खाजगी वैद्यकीय सेवेतून देखील या अभियानाला आपले योगदान देऊन सहकार्य करणे हे देशाच्या विकासाला साथ आहे.
डॉ.परभनकर यांनी टीबी मुक्त व कुष्ठरोग मुक्त भारत अभियान आणि 100 दिवस विशेष मोहिम,BCG लसीकरण,साई टी.बी मार्गदर्शन करून पेशंट संदर्भात येणाऱ्या अडचणी समस्या यावर सविस्तर मार्गदर्शन करून खाजगी डॉक्टर यांच्याकडे येणारे TB संशयित व कुष्ठरोग पेशंट यांचे उपचार समुपदेशन करून टीबी आजार हा उच्चार पूर्ण केल्यास बरा होतो.हा आपण लक्षात आणून देणे गरजेचे आहे असं इतरही मार्गदर्शन त्यांनी यावेळी बोलताना केली. जयकुमार सोनुने, डीगांबर महाजन, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रणजीत फुके, सचिव दिलीप रत्नपारखी यांनी देखील आपल्या मार्गदर्शन केले.उपस्थित या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता गणेश रगुवंशी,संतोष बल्लाळ,आरोग्य सहाय्यक विनोद श्रीराव,सांख्यिकी सहाय्यक प्रमोद उगले,लेखापाल जितेश वर,पि.पि.एस.एय जिल्हा कोऑर्डिनेटर डिगांबर महाजन,क्षेत्रकार्य अधिकारी प्रदिप पट्टेबहादूर,रिना शिंदे,सोनिया भगत,शिपाई भिमटे मॅडम यांची परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पट्टेबहादुर यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.धनश्री जाधव मॅडम केले. उपस्थित सर्वांचे आभार संतोष बल्लाळ यांनी मानले.





Social Plugin