Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत गायकवाड जळगाव 76 प्रजासत्ताक दिन खूप मोठ्या उत्साहात साजरा



प्रतिनिधी -शौकत शेख 

शेवगाव-शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव येथे 76 प्रजासत्ताक दिन हा खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामसभेमध्ये गावातील विविध कामावरती चर्चा करण्यात आली. ग्रामसभेमध्ये आज रोजी दारूबंदी करण्याबाबत गावातील माता भगिनींनी गायकवाड जळगाव ग्रामपंचायत यांना प्रस्ताव देण्यात आला

 या प्रस्तावाला गावातील सर्व सरपंच. उपसरपंच. ग्रामपंचायत सदस्य. गावातील विविध पक्षाचे कार्यकर्ते यांनी पक्षपात न करता सगळ्यांनी सहमती दर्शवली आहे दारू बंद करून या गावाला नवी दिशा देण्याचं काम करण्यासाठी गावातील माता भगिनींनी पुढाकार घेऊन या गावाला योग्य दिशेने जाण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच यांच्या या प्रयत्नांना भरभराटून यश मिळो अशी महाराष्ट्र ग्रामीण न्युज . हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने गावातील माता भगिनींना अभिवादन करत आहोत.