Ticker

6/recent/ticker-posts

हिप्पारगा थडी ज़ि. प्र. शाळा व ग्रामपंच्यात मध्ये 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा



मारोती एडकेवार 

हिप्पारगा थडी :येथे 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने  साजरा करण्यात आला,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी इंग्रजी शब्दाच्या माध्यमातून,मनोगत व्यक्त करण्यात आले.निसर्गप्रेमी माननीय गेंदेवार सर, यांनी प्रस्तावना व सूत्रसंचालन केले,सय्यद या विद्यार्थीने व निसर्ग निर्मिती वृक्षरोपण याविषयी माहिती दिली, 

 गायकवाड सरांनी शाळेतील विद्यार्थ्यांना खूप चांगला उपक्रम राबवले, व  सरपंच इनामदार रहेबर, माजी सरपंच मिया पटेल, व पत्रकार मारोती  एडकेवार, वंचित बहुजन आघाडीचे शाखा अध्यक्ष मुज्जू भाई सय्यद, या सर्वांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले उपस्थित पोलीस पाटील शंकर महाराज, उपसरपंच मारुती एडकेवार, माजी सरपंच साहेबराव आजनिकर, शालेय समिती अध्यक्ष सय्यद एजाज, उपाध्यक्ष सय्यद उमर, भगवान एडकेवार, भुरे लक्ष्मण पटेल, व सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोठेपोड सर यांनी केले