Ticker

6/recent/ticker-posts

सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास..-प्राचार्य डॉ.शिवाजीराव भोसले



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

भारतीय अर्थव्यवस्था शेती व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक खेडे गावच्या  विकासाला चालना मिळते असे प्रतिपादनश्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडीचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी केले. पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात ' ग्रामीण विकासातील सहकार क्षेत्राची भूमिका' एक दिवशीय कार्यशाळा लीड कॉलेज व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी भोसले,  रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद, प्रा.डाॅ.संजय  क्षीरसागर प्रा. डॉ.ए.एस. जगताप, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.एल.के पवार, प्रा.डॉ. एस. आर. शिंदे प्रा. श्रीमती एम.बी. सोनार इत्यादी उपस्थित होते. पुढे आपल्या भाषणात प्राचार्य डॉ. भोसले म्हणाले, 'देशातील ग्रामीण भागाचा आर्थिक विकास होण्यासाठी सहकार क्षेत्राची नितांत गरज असते. सहकारी बँका, पतपेढी, सोसायटी यांच्यामार्फत खाजगी सावकारापेक्षा कमी व्याजदराने कर्जपुरवठा शेतकऱ्यांना केल्यामुळे शेतीच्या व इतर व्यवसायातसाठी  लागणारे भांडवल निर्मिती होत असते. 

ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, कामगार,  शोषित यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची भूमिका सहकार क्षेत्राची आहे. तसेच सहकारा मुळे देशात हरित क्रांती होऊन देशात अन्नधान्यची टंचाई दूर होऊन  व ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी झाली हे महत्व सहकार क्षेत्राचे आहे. याविषयीची माहिती सांगितली चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ.संजय क्षीरसागर  यांनी 'जागतिकीकरणाचे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने' या विषयावर माहिती देताना म्हणाले' 'भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती व्यवसाय  हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कृषी क्षेत्रात अनेक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीतील भरपूर उत्पन्न घेण्यासाठी अनेक अडचणी असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढलेली  दिसून येते. याला कारण म्हणजे भारतीय शेतकरी  यांचे कर्जबाजारीपणा, दुष्काळ,   दर्जेदार बी बियाणांचा अभाव इत्यादी अनेक कारणे आहेत. जागतिकीकरणामुळे सहकार क्षेत्रात अनेक आव्हाने निर्माण झाले आहेत. 

या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार क्षेत्राला अधिक गतिमान व कार्यक्षम बनविले पाहिजे याविषयीची माहिती सांगितली . अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. पी. भोसले  म्हणाले,'देशात हरित क्रांती, श्वेतक्रांती झाल्यामुळे शासनाच्या विविध योजना मुळे शेती व्यवसायातील अडचणीवर शेतकरी मात करू लागला. आणि  आपला आर्थिक विकास करू लागला. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी देशांमध्ये सहकारी बँका, सोसायटी इत्यादी  आहेत. याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.एल.के.पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्रीमती एम. बी. सोनार यांनी केले. तर आभार प्रा.डॉ.एस.आर. शिंदे यांनी मानले .कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.