कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
बदनापुर : लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आनंदो प्रकल्पाचा वतीने बदनापुर येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रेणुका देवी नागरी सहकारी पतसंस्थेचे रिलेशनशीप मॅनेजर जयेंद्र पुरी सर हे होते.
त्यानी विद्यार्थ्यांना चांगल्या पध्दतीने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना सांगितले की, आपण लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या मदतीने स्वतःचा पायावर उभे राहून आपले नाव मोठे करावे. लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या संस्थापिका डाॅ. विल्यी मॅडम यांचे खुप खुप धन्यवाद, कारण बदनापुर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनच्या शिक्षणासाठी त्या काम करत आहे, म्हणून आपण याचा उपयोग आपले जीवन यशस्वी करण्यासाठी करणे गरजेचे आहे हे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना स्वतःला शिस्त लावणे गरजेचे आहे. आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यास करा, पण आधी ठरवा की, आपल्याला काय व्हायचे आहे व सुरुवात करा. त्यासाठी मेहनत करा नक्की एक दिवस तुम्ही मोठे व्हाल. विद्यार्थीनी आपल्या जीवनात सुरूवातीला ध्येय ठरवणे गरजेचे आहे. ध्येय ठरविल्या वर त्या साठी नियोजन व अभ्यास करणे गरजेचे आहे.अभ्यास शिवाय कोणतीही गोष्ट या जगात प्राप्त होऊ शकत नाही. आपण सध्या विद्यार्थी आहोत आणि आपण जे ठरवु ते होऊ शकतो, पण आधी ठरविणे गरजेचे आहे. आपण शिक्षण घेऊनच मोठे होऊ शकतो व कोणतेही पद मिळवु शकतो.
कठोर मेहनत व अभ्यास करून काही ही मिळवु शकतो, त्यामुळे राहीलेल्या वेळेत विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास हा करावा व परीक्षेत चांगले गुण घ्यावेत, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षे साठी खुप खुप त्यांनी दिल्या. या कार्यक्रमाचा प्रसंगी बदनापुर केंद्राचे मुख्य कार्यकारी कैलास कोल्हे, तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.





Social Plugin