Ticker

6/recent/ticker-posts

मकरसंक्रांतीनिमित्त गोरगरीब महिलांना साड्यांचे वाटप



अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ 


अंबड शहरात गेल्या ५० वर्षांपासून मकरसंक्रांतीनिमित्त शहरातील गोरगरीब महिलांना साड्या वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम कापड व्यापारी राबवित आहे. मंगळवारी देखील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापड व्यापारी रमेश राठी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून दिपक ठाकूर, विठ्ठलसिंह राणा, अरूण उपाध्ये, डॉ. राजेंद्र ठोसर, बबन बुंदेलखंडे आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी द्वारकादास जाधव, ओमप्रकाश उबाळे, राजेंद्र डहाळे, सुनील खानचंदानी, भगवान मामाजी जाजू, सुहास सोडाणी, अजित मालानी, औदुंबर बागडे, पांडुरंग जामदरे, राजू मालानी, राजू पटवारी, दीपक मालानी, नगरसेवक शेख फेरोज, शाहुल खरात, नसीर बागवान, रावसाहेब बिडकर, मुळे टेलर आदींची उपस्थिती होती.