महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
अंबड/प्रतिनिधी. मयुर वाव्हळ
अंबड शहर व परिसरात मागील अनेक दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे. शहरात सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहे. याचा परिणाम समाज व्यवस्थेवर होत आहे. शहर परिसरामध्ये अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. येथे शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातून तरूण-तरूणी येतात. परंतु, अवैध धंद्यामुळे तरुणाई वाम मार्गाकडे वळत आहे. याकडे लक्ष देऊन तातडीने अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अंबड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून सतत गुन्हेगारी वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच एका तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही अत्यंत नामुष्कीची बाब आहे. शहर परिसरामध्ये विना परवाना दुचाकी चालविणे, दुचाकींना अनाधिकृत हॉर्न बसविणे, शैक्षणिक संस्था परिसरात भरधाव वेगाने दुचाकी पळविणे यामुळे विद्यार्थिनींना व सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याविरुद्ध अत्यंत कडक कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी समदभाई बागवान, अफरोज पठाण, शिवप्रसाद चांगले, काकासाहेब कटारे, अर्जुन भोजने, हनुमान धांडे, कल्याण तारडे, संभाजी गुडे, नंदू पुंड, गौतम ढवळे, वैशाली कोटंबे, जितेंद्र बुर्ले, मोहन हाश्मी, योगेश ढेंबरे, सलीम बागवान, सुरज गुढे, आखेब पटेल, बाळू सोळुंके, अंकुश झाडे, नरेंद्र वाघुंडे, मोइन शेख, पंकज मणियार, दीपक बिडवे, नईम पठाण, कृष्णा शर्मा, बप्पा गुडे, बाबासाहेब घोलप, परमेश्वर धुळे, लक्ष्मण बोंबले, जावेद पटेल, रामेश्वर फाटे आदींची उपस्थिती होती.





Social Plugin