बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
माण तालुक्याची अर्थवाहिनी व नऊ जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, दहिवडी या संस्थेने ५४० कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा गाठला असून, भविष्यकाळात संस्थेची मोठी प्रगती होईल, असा विश्वास अध्यक्ष अरुण गोरे व्यक्त केला.
पुसेगाव येथे संस्थेच्या वतीने कृष्णात जाधव यांना नवीन जेसीबी मशिन वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक बापू जाधव , राजेंद् जाधव , सरव्यवस्थापक रणजित पोळ, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर गायकवाड , दिलीप शिंदे , मोहनराव जाधव , संदिप घाडगे , मोहन काटकर , अशोक काटकर , सचिन चव्हाण , विजय फडतरे , गणेश बोटे , सेवकवर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या ठेवी ३०३ कोटी ५५ लाख रुपये, तर कर्ज वाटप २३४ कोटी २७ लाख रुपये झाले आहे. एकूण सभासद संख्या १४,३५२ आहे. वसूल भाग भांडवल २५ कोटी रुपये, निधी ५२ कोटी ४४ लाख रुपये, तर गुंतवणूक १४७ कोटी ७८ लाख रुपये एवढी आहे.संस्थेला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून, कायम ऑडिट वर्ग 'अ' मिळविला आहे.





Social Plugin