Ticker

6/recent/ticker-posts

वैजापुरात पिकअपच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

 


प्रतिनिधी जयदीप लोखंडे

 शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीला भरधाव पिकअपने उडवल्याची घटना वैजापूर शहरात घडली आहे. १६ वर्षीय श्रेया हरिचंद्र दुसाने वैजापूर येथील म्हसोबा चौक परिसरात रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या पिकअपने उडवले. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील म्हसोबा चौक परिसरात सकाळी सहा वाजेच्या सायकलवर शिकवणीसाठी जात होती. रस्ता ओलांडत असताना रोटेगाव रोडच्या दिशेने येणाऱ्या पिकअपने श्रेयाला उडविले.हि धडक इतकी भयंकर होती की श्रेयाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.