Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील धनादेश वाटप नियमबाह्य: मालेगाव तहसीलदारांना निवेदन.



 मालेगाव प्रतिनिधी  जावेद धन्नू भवानीवाले


मालेगांव : - 15/01/2025 मालेगाव तालुक्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत वितरीत होत असलेले धनादेश चुकीच्या व नियमबाह्य पद्धतीने वाटप होत असल्याचे निदर्शनास आल्याने तात्काळ हा प्रकार थांबवावा,अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रदिप पाटील मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मालेगाव तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे युवासेनेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,सध्या चालू असलेले धनादेश वाटप हे नियमबाह्य पद्धतीने होत असून,रिसोड-मालेगाव विधानसभेचे विद्यमान आमदार अमित झनक हे स्वतः लाभार्थ्यांच्या घरी जाऊन धनादेश वाटप करत आहेत त्यामुळे हा प्रकार गंभीर असून,संबंधित धनादेश तहसील कार्यालयातूनच वितरित करण्यात यावेत,अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच,या प्रकरणाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानपरिषद आमदार भावना गवळी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे यावेळी निवेदन देताना शहर प्रमुख संतोष बळी,उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर मुंढे,माणीक पाटील गालट,माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल जाधव,युवासेना तालुकाप्रमुख परमेश्वर कव्हर,तालुका सचिव गजानन केंद्रे,सरपंच संजय सोमाणी, अभिजीत घुगे,ऋषीकेश सारस्कर, विशाल राठोड,सुनील ताजणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.