*स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त आयोजन*
मालेगाव प्रतिनिधी जावेद भवानीवाले
मालेगाव ता 15 - मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरात स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा पार पडली या स्पर्धेत विद्यार्थी विद्यार्थीनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची आकर्षक वेशभूषा करून आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीलास्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सोजी होते ,कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे शाळेच्या संचालिका सौ अश्विनी गाभणे ,सौ रोहिणी गाभणे व्यवस्थापक कपिल भालेराव शिक्षिका सौ स्वाती सुरडकर ,सौ नीता भालेराव , पायल कान्हेड शुभांगी गुडदे ,सुजित अवचार प्रिया चोपडे ,हिना माने ,विना वीर सोनाली बेलहारकरआदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक सोजी म्हणाले की स्वामी विवेकानंद यांनी बलशाली युवकांचे स्वप्न पाहिले होते ते म्हणत की स्वस्थ शरीरात स्वस्थ मन राहू शकते प्रा गाभणे म्हणाले की राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चांगले संस्कार केले. यावेळी नीता भालेराव यांनी विचार व्यक्त केले
यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर नाटिका विद्यार्थी अनय गायकवाड अनुज मैंदकर रिहान शेख प्रसन्न सरोदे यांनी सादर केली यावेळी विद्यार्थी सिद्धी तिवारी लावण्या सरोदे गौरी कुकडे रुद्रानी गिर्हे सोहम बळी ईश्वरी अवचार यांनी विचार व्यक्त केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ, राधा काळे यानी परिश्रम घेतले सूत्रसंचालन स्वाती सुरडकर विना वीर यांनी स्वागत शुभांगी गुडदे यांनी तर आभार प्रदर्शन पायल कान्हेड यांनी केले.
.jpg)




Social Plugin