Ticker

6/recent/ticker-posts

बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे ह्यांची संयुक्त जयंती निमित्त भगवा सप्ताह म्हणून हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न



प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर

उल्हासनगर - ५ मध्ये  दसरा मैदान शाखा (विभागीय)  यांच्या वतीने शिवसैनिकांचे श्रद्धास्थान हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर स्व आनंद दिघे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भगवा सप्ताह निमित्ताने  हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना( उबाठा ) गटाच्या  शाखेचे संघटक अनामिका निकम यांच्या वतीने  करण्यात आले  तसेच यावेळेस मा. नगरसेविका वसुधा बोडारे, शिवसेना महिला शहर संघटक जयाताई तेजी, उपशहर प्रमुख सुरेखा दीवीलकर, उपशहर प्रमुख निलम लोटानी रसीका बागवे, कदमताई, व महिला आघाडी यांच्यासह उपविभाग प्रमुख सुनिल साळुंके यांच्या सहकाऱ्याने हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला.तसेच शाखा प्रमुख राहुल पवार, उपशाखा प्रमुख सन्नी ठोलपूरीया, उपशाखा प्रमुख राजेश महेश्वरी यांनी  उल्हासनगर - ५ मध्ये दसरा मैदान शाखा (विभागीय) येथे वंदनीय हिन्दू उदय सम्राट  शिवसेना प्रमुख  स्व बाळासाहेब ठाकरे , आणि धर्मवीर स्व आनंद दिघे,  यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले  तसेच या कार्यक्रमात हळदी कुंकूवाचा लाभ  महिलांनी घेतला हळीकुंकवाच्या निमित्ताने 

 संघटन व्हावे, एकोपा वाढावा आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे हा उदात्त हेतू तर आहेच, त्यानिमित्ताने संस्कृतीची नव्याने ओळख करून घेण्यासाठी भगवा सप्ताह साजरा करण्यात आला