संदिप गावडे @ आष्टा प्रतिनिधी
येथील अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल अँड जुनियर कॉलेज यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त इनोव्हेटिव्ह फेस्टटिव्हल स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्राचार्य सुभाष पाटील यांनी दिली.
याबाबत ते पुढे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) चे आपल्या पुढील पिढीसाठीकसे योगदान असेल याची मुलांच्या मनातील कल्पना जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या कल्पक बुद्धीला चालना देऊन जगाबरोबर राहण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
संस्थेचे सचिव ॲड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांचा दि. ५ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असतो त्यादिवशी होणार आहे. यामध्ये पर्यावरणीय समस्या सोडवण्यात हवामान बदलात व जग हरित बनवण्यात रोबोटिक्स आणि ए.आय. चे योगदान. शिक्षण क्षेत्रातील ए.आय.चे भवितव्य -शिक्षण क्षेत्रात अध्ययन आणि अध्यापनात ए.आय. कसे बदल करत आहे. तसेच भारतातील तरुण पिढीसाठी ए आय चे योगदान असे तीन विषय असतील.
ही स्पर्धा पाचवी ते आठवी व नववी ते बारावी अशा दोन गटात असून विजेत्यांना रोख रकमेचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करून जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
.jpg)




Social Plugin