Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा येथील जे. सी. व आर. जे. हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा


गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जेसी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध रंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कारंजा एज्युकेशन सोसायटीचे सचिव अमोलभाऊ चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जेसी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य हरसुले सर आर जे चवरे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका चोपडे मॅडम यांच्या हस्ते ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले सामूहिक राष्ट्रगीता नंतर आर. जे . चवरे हायस्कूलच्या विद्याथ्यांनी ध्वजगीत सादर केले अतिशय उत्कृष्ट अशा ध्वजगितानंतर आर. जे. चवरे प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणारे देशभक्तीपर गीत सादर केले.

संविधानाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे व संविधानाचे सर्व नागरिकांकडून पालन व्हावे या उद्देशाने जेसी हायस्कूलच्या वर्ग नऊच्या वि‌द्याध्यींनी अतिशय उत्कृष्ट असे पद नाट्य सादर करत संविधानाच्या मूल्यांचे पालन करणारा सामाजिक संदेश दिला. अनुराधा इंगोले मॅडमने या पथनाट्‌याचे लेखन केले तर मार्गदर्शन पांडे सर तायडे मॅडम व वैद्य मॅडम यांनी केले एकूण बारा वि‌द्याथ्यांनी या पथनाट्य मध्ये सहभाग घेतला पथनाट्‌यानंतर जेसी हायस्कूलच्या वर्ग आठ च्या २५ विद्याथ्यांनी रिंग ड्रिल सादर केले देशभक्तीपर गीतावर सादर झालेल्या या रिंग ड्रिल

मध्ये भारतीय तिरंगा विविध प्रकारात विविध आकारात व विविध छटांमध्ये मनोहारी पद्धतीने सादर करण्यात आला शेवटी ड्रिल सादर करताना विद्यार्थ्यांनी सादर केलेले शाळेचे नाव मनमोहक व आकर्षक ठरले. या ड्रीलला संदीप तायडे सरांचे, तायडे मॅडम, जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले, विद्याथ्यींना शिक्षणाचे धडे घेत असतानाच ख-या कमाईचे महत्त्व कळावे व स्वरोजगाराचे बाळकडू मिळावे या हेतूने आनंद मेळावा चे आयोजन करण्यात आले यामध्ये खाद्यपदार्थींचे ३९ स्टॉल त गेम झोन अंतर्गत ९ विविध प्रकारचे आकर्षक असे गेम्स ठेवण्यात आले. सर्वच शिक्षक पालक व विद्याथ्यींनी खाद्य पदार्थींचा मनमुराद आनंद लुटला कार्यक्रमाचे संचालन प्रकाश धेर या नी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.