Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सर्वधर्म मित्र मंडळ सन्मानित



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

वाशीम जिल्ह्यामधील कारंजा  सर्वधर्म मित्र मंडळ  उत्कृष्ट कार्य करत असल्यामुळे यांची दखल घेऊन या संस्थेचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वंस्था प्रमुख सह टीमचा सत्कार केला, २६ जानेवारी २०२५ रोजी वाशिम येथील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे शासकीय ध्वजारोहणानंतर वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना हसन मुश्रीफ साहेब यांनी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम यांच्या वतीने संस्था क्षेत्रात जिल्हा युवा पुरस्कार २०२३ २४ सर्व धर्म मित्र मंडळ कारंजा या संस्थेला प्रदान केला. 

पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये धनादेश सन्मानचिन्ह सन्मानपत्र आहे. यावेळेस पालकमंत्र्याच्या हस्ते स्मृतिचिन्ह, चेक, सन्मान पत्र गुच्छ सर्व धर्म मित्र मंडळ च्या वतीने श्याम सवाई, अजय ढोक, राजू कांबळे दीपक सोनवणे, पंकज चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार वितरण सोहळ्याला जिल्हाधिकारी भुवनेश्वर एस. पोलीस अधीक्षक अनुज तारे मुख्य कार्यपालन अधिकारी वैभव वाघमारे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता व अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्व धर्म मित्र मंडळ गेल्या पंचवीस वर्षापासून वाशिम जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमात आपले सामाजिक दायित्व सिद्ध करत आहे त्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे सर्व धर्म मित्र मंडळाचे सलागार निलेश सोमानी व सौ. भारती सोमानी यांचे मार्गदर्शन संस्थेला नेहमी उपक्रमाकरिता लाभत असते.. सोमानी दाम्पत्य सदैव संस्थेला विविध स्वरूपात व वैयक्तिक स्वरूपातही आर्थिक रूपाने वेळोवेळी सहकार्य करीत असतात.